केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 23 जुलैरोजी एनडीए सरकारचा पहिला अर्थसंकल्प संसदेत सादर केला.या अर्थसंकल्पात देशातील रोजगार वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
या योजनांच्या माध्यमातून पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीसाठी होणाऱ्या नोंदणीच्याआधारे हा प्रोत्साहनपर भत्ता दिला जाणार आहे.यामध्ये मुख्यतः 3 मोठ्या योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
3 योजनांची घोषणा
स्कीम ए योजना (तरूणांना Incentive मिळणार) या तीन योजनांपैकी पहिल्या म्हणजे स्कीम ए मध्ये संघटित क्षेत्रात प्रथमच कामाला लागणाऱ्या तरुणांना प्रोत्साहनपर भत्ता मिळणार आहे. याचे बँक खात्यात तीन टप्प्यांत थेट पैसे जमा केले जातील. या योजनेनुसार नवीन नोकरदारांना 15 हजारापर्यंतचा प्रोत्साहनपर भत्ता म्हणजेच Incentive मिळेल. मात्र, यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. महिन्याला 1 लाख पेक्षा कमी वेतन असणारे नोकरदार या योजनेसाठी पात्र असतील. हे पैसे EPFO खात्यात जमा होतील.
स्कीम बी योजना :
या योजनेचा मुख्य उद्देश हा रोजगार वाढवणे असणार आहे. म्हणजेच प्रथमच नोकरीला लागणारे तरुण आणि त्यांची कंपनी या दोघांनाही भविष्य निर्वाह निधीत जमा करणाऱ्या रक्कमेच्या हिशेबाने इन्सेन्टिव्ह दिले जाईल.नोकरीचे पहिले चार वर्षे हा भत्ता दिला जाईल.
स्कीम सी योजना :
रोजगार आणि कौशल्य विकास स्कीम सी अंतर्गत सर्व क्षेत्रातील नोकरदारांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जाईल.याचबरोबर 5 वर्षात टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप, 100 शहरांमध्ये औद्योगिक पार्क विकसित केले जाण्याची देखील घोषणा करण्यात आली आहे.
याचसोबत MSME हमी योजनेअंतर्गत 100 कोटी रुपयांपर्यंतची कर्जे उपलब्ध होतील, PSU बँकांनी अंतर्गत मूल्यांकनानंतर MSME ला कर्ज द्यावे. MUDRA कर्ज मर्यादा 10 लाख रुपयांवरून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.
No comments:
Post a Comment