वेध माझा ऑनलाइन।
कोयना धरण 71.51 टक्के भरले असून धरणात 75 हजार 215 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. दरम्यान, आज दुपारी ४ वाजता धरणाचे दरवाजे १ फूट ६ इंजाने उघडण्यात येणार आहेत.
आतापर्यंत कोयनानगर येथे 163, नवजामध्ये 237 आणि महाबळेश्वरला 307 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. धरणात प्रतिसेकंद ७५ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनेत 3 हजार 057 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर नवजा येथे आतापर्यंत 3 हजार 622 आणि महाबळेश्वरमध्ये 3 हजार 108 मिलीमीटर पाऊस झाला आहे. कोयना धरणात आवक वाढली आहे.
दरम्यान आज दरवाजातून १० हजार आणि आणि पायथा वीजगृहातून १०५०, असा एकूण ११ हजार ५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होणार आहे.
No comments:
Post a Comment