Friday, August 9, 2024

अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांचा अपघात ? क़ाय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
आज (09) ऑगस्ट रोजी शिवनेरी गडावर शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसेच खासदार अमोल कोल्हे यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली. शिवनेरी गडावर शेकडो कार्यकर्ते देखील हजर होते. शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. शिवनेरी गडाच्या पायथ्याजवळ एक मोठा अपघात टळला.

नेमकं काय घडलं?
शिवस्वराज्य यात्रा सुरु झाली आहे. दरम्यान यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी शिवनेरी गडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर क्रेनची ट्राॅली एकाच बाजूली कलंडली. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली.
क्रेनच्या ट्राॅलीमध्ये बिघाड-
शिवाजी महाराज यांच्या पुताळ्याची उंची वर होती, त्यामुळे महाराजांच्या पुताळ्याला पुष्पहार घालण्यासाठी क्रेनच्या सहाय्याने उंचावर चढून पुष्पहार घातला. मात्र, पुष्पहार घालून खाली उतरताना अर्ध्यावर पोहचल्यावर क्रेन तुटली आणि यावेळी चौघही एका बाजूला कलांडले आणि मोठा आपाघात टळला. दरम्यान, क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे क्रेनची ट्राॅली एका बाजूने कलांडली असं समोर आला आहे.
दरम्यान
माध्यमांशी बोलत असताना जयंत पाटील म्हणाले की, आमची यात्रा ही अत्यंत साधी आहे, आमचा काही इव्हेंट नाहीये. आम्हाला जनतेच्या मनातले प्रश्न जाणून घ्यायचे आहेत, त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा मिळतोय, अशा शब्दात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर जयंत पाटलांनी टिका केली.



No comments:

Post a Comment