Sunday, August 18, 2024

संभाजी भिड़े यांचे मराठा आरक्षणावर मोठ वक्तव्य ...

वेध माझां ऑनलाइन
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांनी बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पुकारला जाणार असल्याची माहिती देण्यासाठी संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोलकाता बलात्कार प्रकरणापासून ते राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत रोखठोक भाष्य केलं.

संभाजी भिडेंचं मोठं वक्तव्य
संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. मराठ्यांनी आरक्षण मागावं का?, असा सवाल संभाजी भिडे यांनी उपस्थित केलाय. मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठून काढलंय, असंही भिडे म्हणालेत.
मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा आहे, पण मराठ्यांनी आरक्षण मागावे का? मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठले काढले. मराठा जात संपूर्ण देशाचा संसार चालवणारी जात आहे. हे ज्यावेळी मराठ्यांच्या लक्षात येईल त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. मात्र हे मराठ्यांच्या लक्षात येत नाही हे दुर्दैव आहे, असे संभाजी भिडे म्हणाले.
बांगलादेशमधील नंगानाच थांबायला हवा”
बांगलादेशमध्ये हिंदू वर होणाऱ्या अत्याचाराविरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा अशी प्रतिक्रियाही संभाजी भिडेंनी दिली.
बांगलादेशमध्ये हिंदूवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात श्री शिवप्रतिष्ठान सांगली जिल्ह्यात 25 ऑगस्ट रोजी कडकडीत बंद पाळला जाणार आहे. बांगलादेशमधील नंगानाच तात्काळ थांबायला हवा यासाठी केंद्राने पुढाकार घ्यावा, असं भिडेंनी म्हटलंय.
देशात बलात्कार प्रकार हा किळसवाणा झालाय, हा अत्याचार थांबायला हवेत. कोणत्याही स्त्रीवरचा बलात्कार म्हणजे मातेवर बलात्कार आहे, असं संभाजी भिडे म्हणाले

No comments:

Post a Comment