Sunday, August 11, 2024

आ. जयकुमार गोरे यांच्यासह पदधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल ; क़ाय आहे बातमी?

वेध माझां ऑनलाइन।
कोरोना काळात मायणी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यावर मृत लोक जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, आता घोटाळा प्रकरणात सहभागी असलेले माण विधानसभेचे आ. जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख आणि संस्थेशी निगडित पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हायकोर्टात या प्रकरणातील चौकशीची मागणी करणारे याचिकाकर्ते दीपक देशमुख हे संस्थेचे उपाध्यक्ष असल्यामुळे त्यांच्यावरही केला गुन्हा दाखल करण्यात असून सातारा जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्यचे अधिकारी देविदास बागल यांनी या संस्थेतील सर्व जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर वडूज पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
भाजपा आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधातील भ्रष्टाचारांच्या आरोपांना गंभीरतेनं घ्या अशा सक्त सूचना मुंबई उच्च न्यायालयाने सातारा पोलिस अधीक्षकांना दिल्या होत्या. आमदार जयकुमार गोरे यांनी कोविड काळात 200 पेक्षा अधिक मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधीवाटपात घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी मायणी येथील दीपक देशमुख यांनी जयकुमार गोरेंविरोधात हायकोर्टात याचिका केली होती. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाकडून या याचिकेची गंभीर दखल घेण्यात आली होती जयकुमार गोरे यांच्यासह  घोटाळ्यात सहभागी इतर आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची या याचिकेतून मागणी करण्यात आली होती . आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला 

No comments:

Post a Comment