सध्या कराड परिसरात चर्चा आहे ती म्हणजे मल्कापुरच्या हौसाई विद्यालयाच्या विद्यार्थिनीच्या प्रामाणिकपणाची...हौसाई विद्यालयाची दहावीत शिकणारी आलिशा आगा हीचा प्रामाणिकपणा काल दिसून आला तिच्या त्या प्रामाणिकपणाचे कौतुक व आदर्श घेण्याची गरज सध्या निर्माण झाली आहे ...
त्याचे झाले असे की...
ही विद्यार्थिनी काल शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना कराड शहर पोलीस स्टेशनच्या समोर तिला एक पाकीट सापडले तिने ते पाकीट कराड शहर पोलीस स्टेशन मध्ये जमा केले...दरम्यान पोलिसांनी ते पाकीट उघडल्यानंतर त्यात रक्कम रुपये 21 हजार 500 असल्याचे आढळून आले. तसेच ज्याचे पाकिट आहे त्याचे आधार कार्डदेखिल त्यामध्ये होते.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीला फोन करून पोलीस स्टेशनमध्ये बोलवले आणि त्यांच्याकडे ते पाकीट सुपूर्द केले. त्याचवेळी त्यांनी आलिशाला तिच्या प्रामाणिकपणाचे बक्शीस म्हणून 100 रुपये दिले....आलिशा ते बक्शीस घेवून तिथून बाहेर पडली असता तिला 4 ते 5 लहान मुले ठण्डीने कुडकुडत आहेत असे दिसून आले...आलीशाने लग्गेच बक्शीस मिळालेले त्या शंभर रुपयाचे पाच वडापाव आणले आणि त्या ठण्डीने कुड़कुड़त असलेल्या गरीब लहान मुलाना खाऊ घातले...
खरतर...अलिशाचे जरी वय लहान असले तरी तिचे विचार, संस्कार , माणूसकी आणि समजूतदारपणा नक्कीच प्रत्येकाने अनुकरण करावा असाच आहे...एखाद्याच व्यक्तिकडे असे गुण दिसुन येतात... आणि त्याचा समाजहितासाठी नक्कीच उपयोग होत असतो... म्हणूनच अशा गुणसम्पन्न आलिशा या विद्यार्थिनीचे कौतुक करावे तेवढे थोड़ेच आहे... समाजोन्नतिसाठी अशा गुणांचे अनुकरण व अभिनदंन झालेच पाहिजे... दरम्यान हा सर्व प्रकार समजल्यानंतर हौसाई शाळेच्या प्रत्येकाची मान नक्कीच अभिमानाने उचावली... आणि अलिशाचा सत्कार शाळेच्या वतीने करण्यात आला...
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश वेदपाठक, शामराव पाटील विद्यालयाचे प्राचार्य जीवन फुके, कल्याण कुलकर्णी, धनाजी पाटील, बालाजी मुंडे, पद्मावती पाटील, अंजना जानुगडे, ऋषिकेश पोटे, वीरभद्र खुरपे, विकास शिंगाडे, किरण शिंदे, महेंद्र आंबवडे यांची उपस्थिति होती
No comments:
Post a Comment