बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांनी 23 सप्टेंबर रोजी एन्काऊंटर केला. मात्र, अजूनही त्याचा अंत्यविधी करण्यात आलेला नाही. अनेक शहरांमधून त्यांच्या अंत्यविधीला विरोध सुरुच आहे. आता अंबरनाथच्या हिंदू स्मशानभूमीत अक्षय शिंदेच्या दफनविधीला विरोध करण्यात येतोय. स्मशानभूमीच्या बाजूला शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेधाचा बॅनर लावण्यात आला आहे. बदलापूर घटनेतील विकृत नराधम अक्षय शिंदेला अंबरनाथ हिंदूस्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात जाहीर निषेध असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलाय.
No comments:
Post a Comment