Sunday, December 22, 2024

परप्रांतीयांचा धुडगुस ; मराठी कुटुंबियांना बेदम मारहाण ; 4 वर्षाच्या चिमुकलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारला म्हणून केली मारहाण ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन
कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत कल्याणमध्ये परप्रांतियांनी अक्षरश: धुडगूस घातलाय. चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव असून त्यांच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

याबाबत अधिकची माहिती अशी की, मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.  दरम्यान, याची माहिती संबंधित चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत मराठी तरुण जखमी झालाय तर तरुणाच्या पत्नीला आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत. या प्रकरणी पांडे पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय. 


No comments:

Post a Comment