Thursday, December 26, 2024

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी पंकजा मुंडे यांचे मोठे विधान ;

वेध माझा ऑनलाइन।
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या झाल्याची घटना घडली आहे. मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमागे राजकीय कनेक्शन असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे. दरम्यान, आता पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख हत्ये प्रकरणी एक भाष्य केलं आहे, ज्याची सगळीकडे एकच चर्चा सुरु आहे.

संतोष माझा बूथप्रमुख 
माध्यमांशी बोलत असताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, संतोष देशमुख हा माझा बूथप्रमुख होता. हे प्रकरण घडलं त्यावेळेस गोपीनाथ गडावरुन पहिली एसआयटीची मागणी मी केली होती. सध्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहेत आणि ते लेकराला नक्की न्याय देतील आणि त्यांच्या घरच्यांना सुद्धा न्याय देतील असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

बड्या नेत्यांची नावे समोर ; 
दरम्यान, आज अंजली दमानिया यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून पिस्तुलीचा होत असलेल्या गैरप्रकारावर ट्वीट केलं आहे. मात्र या ट्विटमुळे बीड जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र आता वाल्मिक कराडच्या नावासह आता बीड जिल्ह्यातील बड्या नेत्यांची नावे समोर आल्याने चर्चांना प्रचंड उधाण आले आहे.


No comments:

Post a Comment