गेल्या 4 महिन्यांपूर्वी कराड नगरपरिषदेत घडलेल्या लाच प्रकरणातील आरोपावरून तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना आज गुरुवारी अटक करण्यात आली आहे. त्यांना कराड येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बांधकाम परवानगीसाठी १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी खंदारे यांच्यासह चौघांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती, त्यामध्ये तिघांना अटक करण्यात यश आले होते, मात्र खंदारे फरार होते. आज गुरुवार, दि. 24 रोजी सकाळी साताऱ्यात स्थानिक गुन्हे विशेष शाखेने त्यांना अटक करून लाच लुचपत विभागाकडे सोपवले होते. त्यानंतर संबंधित विभागाने खंदारे यांना आज कराड येथील अतिरिक्त जिल्हा कोर्टात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 28 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
No comments:
Post a Comment