वेध माझा ऑनलाईन।
मुंबई वांद्रे परिसरात 42 एकर जमीन डिफेन्स लँड संरक्षण विभागाच्या मालकीची असल्यामुळे 9483 झोपड्यांचे पुनर्वसन रखडले आहे. ही लक्षवेधी ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी विधानसभेत मांडली. यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांच्या उत्तरावर ठाकरे गटाचे आमदार चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. तर ठाकरेंच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील विधानसभेत आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले.
शंभूराज देसाई म्हणाले की, मला यात अधिक खोलात जायचे नव्हते पण आता माझ्याकडे अपूर्ण ब्रीफिंग आहे. मला नम्रपणे सांगायचे आहे की 2019 ते 2022 या वर्षांमध्ये या प्रकरणाचा एकदाही पाठपुरावा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे केलेला नाही. मंत्री शंभूराजे देसाई यांनी असे म्हणताच विधानसभेत प्रचंड गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर शंभूराजे देसाई म्हणाले की, तुम्ही 2019 ते 2022 पर्यंत काय केले? याबाबत सांगा. एकदाही पत्र दिले नाही. एकदाही पाठपुरावा केला नाही. त्यावेळी कोणाचे सरकार होते? 2022 साली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर चार वेळा आम्ही पत्र दिली. तुम्ही काय केले? आमचे लाज काढू नका. तुम्ही काय केले ते सांगा? असे म्हणत शंभूराज देसाई यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली. मी 2019 ते 2020 यावेळेत पाठपुरावा झाला नाही, हे मी म्हटलो.जर मी कोणाचं नाव घेतलं नाही तर मग एवढी नाकाला मिरची लागायचं कारण काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
No comments:
Post a Comment