उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक व शिवसेना नेते रणजीत पाटील नाना यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराचा दिवसभरात सुमारे दहा हजार नागरिक व महिलांनी लाभ घेतला.
सकाळी शिबिराचे उद्घाटन कराड अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक दिलीप गुरव यांच्या हस्ते झाले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार, विक्रम घोरपडे, सलीम मुजावर, डॉ. मोहन पाटील, धीरजशेठ गांधी, प्रा. आटकर, पै. संतोष वेताळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या शिबिरात नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया साठी तपासणी करण्यात आली जवळचा चष्मा मोफत देण्यात आला स्त्रीरोग तपासणी शिबिरात भाग घेणाऱ्या महिलांना भेटवस्तू देण्यात आली जनरल मेडिसिनचे मोफत औषध वाटप करण्यात आले त्याबरोबर दंतच चिकित्सा हाडांची तपासणी बीपी शुगर तपासणी महा लॅब द्वारे विविध चाचण्या याचाही गरजू नागरिकांनी लाभ घेतला गरजू महिलांना नवीन शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी मूळ किमतीवर 30 टक्के सवलत देण्यात आले या कार्यक्रमात अंगणवाडी सेविकांचा गुलाबाचे रोप व फळ झाड देऊन सन्मान करण्यात आला. शाळा क्रमांक 9 मध्ये शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तर 10 अंगणवाडीतील मुलांना खाऊ व गणवेश वाटप करण्यात आले. एकूण चार हजार वह्यांचे वाटप करण्यात आले.
आरोग्य कर्मचाऱ्यांना रेनकोट; ज्येष्ठांना छत्री वाटप
शहर स्वच्छतेची कामे करणारे आरोग्य कर्मचारी, मुकादम यांना रणजीतनाना पाटील मित्र मंडळातर्फे रेनकोट वाटप करण्यात आले. आरोग्य शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या आशा वर्कर्स यांना गुलाबाचे रोप भेट देण्यात आले. तर ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री व काठी वाटप करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment