वेध माझा ऑनलाइन
पहलगाम हल्ल्यानंतर त्याचा बदला आम्ही घेतला, 22 एप्रिलच्या हल्ल्याचा बदला भारतीय सैन्याने 22 मिनिटात घेतला आणि दहशतवाद्यांना गाढलं असा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना पोसणाऱ्या आकांची आजही झोप उडाली असं नरेंद्र मोदी म्हणाले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पासून ते सिंधूरपर्यंत हल्ला करत पाकिस्तानला धडा शिकवला असं नरेंद्र मोदी संसदेत आपल्या भाषणात म्हणाले.
मोदी म्हणाले
पहलगामवरील हल्ला म्हणजे भारताला हिंसेचा खाईत लोटण्याचं आणि देशात दंगे करण्याचा प्रयत्न होता. पण देशवासियांच्या एकीमुळे तो प्रयत्न फसला. आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाढणार असा संकल्प मी त्यावेळी केला होता. या हल्ल्याची सजा दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्यांना मिळणार. 22 एप्रिल रोजी हा हल्ला झाल्यानंतर मी परदेशातून लागोलाग आलो. त्या दिवशी एक बैठक बोलावली आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणार असा निश्चय केला.
आमच्या सैन्यबलाच्या संकल्पावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना कारवाईसाठी पूर्ण मोकळीक दिली. त्यांनीच ठरवावं की कुठे आणि कधी हल्ला करायचा, सैन्याला सर्व अधिकार दिले. त्यानंतर सैन्याने अशी कारवाई केली की त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणारे आजही थरथरतात.
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर केवळ तीन देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला. तर भारताच्या बाजूने जगभरातून पाठिंबा मिळाला. जगभरातून समर्थन मिळालं पण माझ्या देशातील विरांना काँग्रेसचं समर्थन मिळालं नाही हे दुर्दैव.पहलगामच्या हल्यानंतर मोदींची 56 इंच छाती कुठे गेली असा प्रश्न विचारण्यात आला. दहशतवादी हल्ल्यानंतरही काँग्रेसने राजकारण केलं. काँग्रेसच्या स्वार्थी राजकारणामुळे देशाच्या सैन्यबलाचे मनोबल कमी होत होतं. काँग्रेसला ना भारताच्या समार्थ्यावर विश्वास आहे ना भारतीय सैन्यावर.आमचा हल्ला निश्चित होता, आमचे ध्येय निश्चित होतं. भारताने ते लक्ष्य पूर्ण केलं. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर स्थगित केलं. जगातल्या कोणत्याही नेत्याने हा हल्ला थांबवण्यासाठी विनंती केली नाही हे मी जबाबदारीने सांगतोय.
9 मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती हे सातत्याने मला फोन करत होते. तीन-चार वेळा फोन केल्यानंतर मी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, पाकिस्तान मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, असं जर झालं तर पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल. भारत त्यापेक्षाही मोठा हल्ला करेल. आम्ही गोळीला उत्तर गोळीने देणार.
पाकिस्तानने जर यापुढे असं काही केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल. आजचा भारत हा आत्मविश्वासाने भरला आहे. आजचा भारत हा आत्मनिर्भर आहे. एकीकडे भारत गतीने पुढे जात आहे, पण दुसरीकडे काँग्रेस मतांसाठी पाकिस्तानवर निर्भर होत आहे. काँग्रेसकडून राजकारणासाठी जनतेमध्ये अविश्वास निर्माण केला जात आहे.
सातत्याने भारतीय सैन्याच्या कामगिरीवर काँग्रेसने अविश्वास दाखवला आहे. देशाने नुकताच कारगिल विजय दिवस साजरा केला. पण काँग्रेसने कधीही कारगिर विजय दिवस साजरा केला नाही. ज्या वेळी डोकलाममध्ये भारतीय सैन्य धाडस दाखवत होतं, त्यावेळी काँग्रेसचे नेते कुणाकडून छुपी माहिती घेत होते हे सगळ्यांनाच माहिती आहे. आताही काँग्रेसने पाकिस्तानला क्लीन चिट दिली. पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा पुरावा काँग्रेस मागत आहे. नेमकी हीच मागणी पाकिस्तान करत आहे. आज ज्यावेळी त्यांना सगळे पुरावे दिले तर त्यांची अवस्था बिथरल्यासारखी झाली आहे.
भारतीय एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले. 9 मे रोजी पाकिस्तानने एक हजार ड्रोन मिसाईलच्या माध्यमातून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हे मिसाईल भारताच्या कोणत्याही ठिकाणी पडू शकत होते. पण ते सर्व मिसाईल भारताने हवेतच नष्ट केले. भारतीयांना याचा अभिमान वाटला. पण काँग्रेसने पाकिस्तानने केलेले खोटे दावे पसरवण्याचा प्रयत्न केला असंही मोदी म्हणाले.
No comments:
Post a Comment