वेध माझा ऑनलाईन।
संपूर्ण राज्यालाच नाही तर अगदी दिल्लीपर्यंत ज्याची उत्सुकता आहे तो ठाकरे बंधूंचा मेळावा आज मुंबईत साजरा करण्यात आला. विजयी मेळाव्याच्या निमित्ताने तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावर एकत्र दिसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची स्टेजवर ग्रँड एन्ट्री झाली. त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र भावूक झाल्याचं दिसून आलं.
दरम्यान, विजयी मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी एकत्र फोटो काढले. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी देखील स्टेजवर पुढे येत हातात हात मिळवला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना स्टेजवर बोलावले. यानंतर आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे काका उद्धव ठाकरेंच्या बाजूला उभे राहिले. यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना जवळ घेतल्याचं पाहायला मिळालं.
No comments:
Post a Comment