वेध माझा ऑनलाईन;
राज्यात सातत्याने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांकडून होत असलेल्या मागणीला काही प्रमाणात यश आलं. शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष, ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भविष्यातील युतीचे संकेत दिले. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना-मनसे युती होईल, असा कयास लावला जात असतानाच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावर, आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तरी जाहीर होऊ द्या, मग पाहू, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. बाळा नांदगावकर यांनी केलेल्या वक्तव्यावर आधी आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली होती, आता उद्धव ठाकरेंनीही भाष्य केलं आहे. यासंदर्भात बोलू नये, असे आदेश त्यांच्या पक्षप्रमुखाने दिले आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच, आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्या, मग बोलू असेही त्यांनी म्हटले. तत्पूर्वी, याबाबत आदित्य ठाकरे यांनाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, 5 जुलैला आम्ही एकत्र आलो होतो ते एका गोष्टीसाठी, ती म्हणजे तिसऱ्या भाषेच्या सक्तिविरोधात. सध्या निवडणुकांचं वातावरण दिसत आहे, जे काय महाराष्ट्राच्या मनात आहे ते आमच्या बाजूने आम्ही करु, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं. आम्ही राजकारण पाहत नाही, आम्ही महाराष्ट्राचं हित पाहतो असेही ते म्हणाले. बाकीच्या पक्षांबद्दल मी काही बोलू शकत नाही, असे आदित्य यांनी म्हटले होते. तर, आता उद्धव ठाकरेंनीही आपली भूमिका मांडली आहे.
बाळा नांदगावकर म्हणाले ...
युतीसंदर्भात बाळा नांदगावकर यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. आत्तापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवली आहे, त्यामुळे आताही वेळ आली तर एकटे निवडणूक लढवू, अशी सूचक प्रतिक्रिया नांदगावकर यांनी होती. त्यामुळे, मुंबईसह राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना-मनसे युतीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
No comments:
Post a Comment