बोगस मतदारांवर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी 14 तपासून चालू असलेले कपील ग्रामपंचायतचे माजी सदस्य गणेश पवार यांचा उपोषणाचा आज नऊवा दिवस असून आजपासून वैद्यकीय उपचार नाकारणार असल्याची माहिती गणेश पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान गणेश पवार यांची तब्बेत खालावली असून त्यांचा रक्तदाब देखील "लो' होत असल्याची माहिती मिळत आहे याची प्रशासनाने आतातरी दखल घेणे गरजेचे असल्याचे बोललं जातंय
कापील गावच्या मतदार यादीमध्ये 2024 च्या विधानसभेला 9 मतदारांची नावे त्यात सामील झाली हे लोक कापील चे रहिवासी नाहीत, यांची कोणतीही मालमत्ता या गावात नाही, ते भाड्याने सुद्धा येथे राहत नाहीत. तरीसुद्धा यांची नावे मतदार यादीत आली आहेत यासाठी चुकीच्या कागदपत्राचा वापर केल्याचा आरोप गणेश पवार यांनी केला आहे.
या 9 मतदारांची अन्य ठिकाणी असलेली मतदार यादीमधील नावे आयोजित पत्रकार परिषदेत सादर केली. तरीसुद्धा शासन यावर कोणतेही कारवाई करत नाही. यासाठी मोठी तडजोड झाल्याचा आरोपही गणेश पवार यांनी केला आहे. त्या 9 मतदारावर गुन्हे दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करावी असही ते यावेळी म्हणाले
No comments:
Post a Comment