Friday, August 15, 2025

निवडणुका घेताच कशाला? पालघरमध्ये एकाच महिलेचे मतदारयादीत सहा ठिकाणी नाव असल्याचं आलं समोर : त्यावरुन माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर केली टीका ;

वेध माझा ऑनलाइन 
निवडणूक आयोगाला मतदारयादीत घोळ घालून निवडणुका घ्यायच्या असतील तर त्यांनीच ग्रामपंचायतीपासून आमदार-खासदार पदाचे उमेदवार जाहीर करावेत, निवडणुकीचा प्रश्न उरणार नाही अशी संतप्त टीका बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केली. हितेंद्र ठाकून यांनी निवडणूक आयोगावर थेट आणि गंभीर आरोप केले आहेत.

अलीकडेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदारयादीतील घोळाबाबत आयोगावर टीका केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर पालघरच्या सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे एका मतदार यादीत तब्बल सहा वेळा नाव असल्याचा प्रकार उघड झाला. याच मुद्द्यावरून ठाकूर यांनीही निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला.
अशा प्रकारचे असंख्य घोळ मतदारयादीत आहेत. आम्ही हे प्रकार वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. लोकसभा आणि विधानसभेत अशाच प्रकारे परिवर्तन झालं असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदाराच्या घोळावर प्रतिक्रिया देताना हितेंद्र ठाकूर म्हणाले की, "जर निवडणूक आयोगाकडूनच अशी निष्क्रियता राहणार असेल, तर यापुढे कोणत्याही निवडणुका घेण्याची गरज नाही. थेट ग्रामपंचायतीपासून आमदार- खासदारापर्यंतचे उमेदवार आयोगानेच घोषित करावेत. त्यामुळे ग्रामपंचायतचा सदस्य कोण किंवा आमदार कोण हा निवडणुकीचा प्रश्नच राहणार नाही

No comments:

Post a Comment