स्पर्धेच्या युगात विद्याथ्यांर्ची वाचन संस्कृती जपली पाहिजे , थोरपुरुषांची चिरीत्रे , पुस्तके वाचणे गरजेचे असून सध्याच्या युगात विदयार्थी घडला तरच चांगल्या समाजाची निर्मीती होत असते असे प्रतिपादन प्राचार्य प्रा. के.पी.वाघमारे यांनी विद्यार्थी गौरव सन्मान सोहळ्यामध्ये केले.
कराड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजमंदिर येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवक संघ बुधवार पेठ कराड यांच्यावतीने बुधवार पेठेतील सन २०२४-२०२५ सालातील दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचा गौरव सन्मान सोहळा पार पडला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.के.पी.वाघमारे बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.नगरसेवीका बेबीताई थोरवडे, तसेच संघाचे अध्यक्ष गौतम लादे, उपाध्यक्ष मारुती काटरे, सचिव संजय शिखरे,मा.नगरसेवक शांताराम थाेरवडे मिलींद कांबळे, धनाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी संघाच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्राचार्य प्रा.के.पी.वाघमारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर सामुदायीक बुध्दवंदना घेणेत आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलींद कांबळे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय संजय शिखरे यांनी केला. त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रा. के.पी.वाघमारे यांचा व पाहुण्यांचा सत्कार करणेत आला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचा सन्मान चिन्ह , शालेय साहित्य देवून मोठ्या उत्साहात सन्मान करण्यात आला. प्रा.वाघमारे पुढे बोलताना म्हणाले स्पर्धेच्या युगात विद्याथ्यानी उतरणे अत्यंत गरजेचे आहे. विद्यार्थी व विद्यार्थींनी यांचा उर्तीर्ण झालेबद्दल गौरव सन्मान सोहळा या सारखे उपक्रम राबविणे काळाची गरज आहे. तसेच मुलांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सह थोरपुरुषांची पुस्तके वाचन केल्यामुळे इतिहास समजतो त्यामुळे यशस्वी होण्यासाठी वेगळी चालना मिळते व आपल्या भविष्यासाठी ते खुप ते गरजेचे आहे. असे त्यांनी सांगितले. त्याबरोबर आपल्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवक संघ बुधवार पेठ कराड यांनी असे समाजाेपयोगी कार्यक्रम राबवावे असे सांगितले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल सरतापे , विकास लादे, रवींद्र लादे, प्रशांत थोरवडे, अमोल सोनवले, नितीन लादे, सिद्धार्थ कांबळे, रवी काटरे, राजेंद्र बा.कांबळे, रत्नाकर कांबळे,भास्कर काटरे, अतुल माने, रणजित थोरवडे , प्रवीण शिंदे व इतर सदस्यांनी परिश्रम घेतले. शेवटी संजय शिखरे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment