भाजपचे कराड शहर सरचिटणीस व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अनुलोम संघटनेचे सदस्य अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे कराड शहर अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे कराडच्या प्रभाग क्रमांक 15 मधून भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास ते त्याठिकाणी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत असे त्यांनी म्हटले आहे
विश्वनाथ फुटाणे हे गेली 15 वर्षे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत फडणवीस यांच्या अनुलोम संघटनेचे ते सदस्य आहेत आर एस एस चे विचार उराशी बाळगणारे फुटाणे हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहर अध्यक्ष म्हणून देखील कार्यरत आहेत भाजप नेते विक्रम पावसकर व आमदार डॉ अतुल भोसले यांचे नेतृत्व ते मानतात ते स्वतः ओबीसी समाजाचे आहेत ओबीसी समाजाचे युवा कार्यकर्ते म्हणूनही ते परिचित आहेत त्यांना भाजपचे निष्ठावन्त म्हणून ओळखले जाते कोणाला कसलीही अडचण असेल तर ते मदतीसाठी नेहमी पुढे असतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत त्यांनी भाजपचे आमदार डॉ अतुल भोसले यांचा जोमाने प्रचार केल्याचे दिसले
त्यांचे समाजकार्य अनेकवर्षं सातत्याने प्रभाग क्रमांक 15 मध्ये सुरू आहे कोविड मध्ये त्यांनी केलेलं काम न विसरता येण्यासारखे आहे वार्डात लसीकरण मोहीम असेल मतदार नोंदणी मोहीम असेल तसेच परिसरातील महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम त्यांनी त्याठिकाणी राबवले आहेत तसेच विविध शासकीय योजनांचा जनतेला लाभ उपलब्ध करून देण्यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न दिसले आहेत
त्यांनी प्राथमिक सदस्यापासून सुरुवात करत भाजप मधून आपले कार्य चालू ठेवले आहे प्रथम बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख. तसेच तीन वर्ष कामगार मोर्चा शहर अध्यक्ष आणि मागील तीन वर्षांपासून भाजपचे कराड शहर सरचिटणीस म्हणून ते काम पहात आहेत लोकसभा व विधानसभा या दोन्ही निवडणुकीत प्रचार यंत्रणा राबविण्यामध्ये ते सक्रिय होते मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुलोम या संस्थेत कार्यरत आहेत फडणवीस यांनी स्वतः त्यांना रामाची मूर्ती भेट दिली आहे
प्रभाग क्र 15 मध्ये सर्व रोग निदान शिबीर, आयुष्मान कार्ड शिबीर, रेशन कार्ड विषयक शिबीर, आधार अपडेट्स इ सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून विशेष ओळख आहे टोलमाफी संदर्भात आंदोलन करत त्यांनी आपला सहभाग नोंदवला होता
ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह एका छोट्या व्यवसायातून करतात आणि त्यातूनच आर्थिक बचत करत सामाजिक कार्यासाठी ते आपली तरतूद करून स्वखर्चाने अनेक सामाजिक उपक्रमांना मूर्त स्वरूप देताना दिसतात त्यांना असणारी सामाजिक कार्याची आवड एवढंच त्यामागाचे कारण आहे 15 नंबर प्रभागात ओबीसी आरक्षण पडले आहे त्यासाठी त्यांनी आपली मोर्चेबांधणी त्याठिकाणी केली आहे भाजप पक्षाने तिकीट दिल्यास त्याठिकाणी ते निवडणूक लढवणार आहेत असे ते म्हणाले आहेत
No comments:
Post a Comment