लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जिवंतपणी गोळ्या घालण्याची धमकी देणाऱ्या भाजपा प्रवक्त्याला अटक करण्यात यावी, या मागणीचे निवेदन आज कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने कराडचे मा. तहसीलदार यांना देण्यात आले.दरम्यान माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांची यावेळी उपस्थिती नव्हती याची चर्चा पत्रकारांच्यात पुन्हा झाली यावेळी पत्रकारांनी याच काही संदर्भातील विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तरे देणे उपस्थित नेत्यांनी टाळले
यावेळी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष भानुदास माळी, कराड दक्षिण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नामदेवराव पाटील, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अजितराव पाटील, राजेंद्र चव्हाण, माजी जि. प. सदस्य निवासराव थोरात, पाटील, अधिकराव गरुड, दिग्विजय सूर्यवंशी, सुभाषराव पाटील, विठ्ठलराव शिखरे, नानासो जाधव, दीपक पाटील, गजानन आवळकर, संजय माळी, दत्तात्रय काशीद, शशिकांत महापुरे, नितीन पाटील, आनंदराव जाधव, शंकरराव पवार, कराड चे माजी नगरसेवक अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, संतोष जगताप, पंकज पिसाळ, भीमराव पाटील, शब्बीर मुजावर, देवदास माने, जयवंतराव पाटील, सुरेश भोसले, सयाजी पाटील आदिसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान नुकतेच काँग्रेसने कराड तालुक्यात नामदेव पाटील यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मात्र ही नेमणूक अचानक का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे विश्वासू मानले जात होते. तथापि, शिंदे सध्या भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा असून, त्यामुळेच त्यांना डावलून काँग्रेसने तातडीने नूतन अध्यक्ष नेमल्याचे बोलले जात आहे.
याबाबत पत्रकारांनी आज उपस्थित काँग्रेस नेत्यांना विचारणा केली असता आजचा तो विषय नाहीये त्यावर नंतर बोलू असे म्हणत नेत्यांनी उत्तर देणे टाळले
तसेच कराड दक्षिणमध्ये 40 हजारांनी मते वाढल्याचा दावा काँग्रेसचे ओबीसी नेते भानुदास माळी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. याबाबत पुरावे सादर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र पत्रकारांनी याच संदर्भात विचारले असता काँग्रेसच्या नेत्यांनी याचेही उत्तर देण्याचे सरळसरळ टाळले. “हा प्रश्न काँग्रेसनेच उपस्थित केला आहे, आम्ही फक्त स्पष्टीकरण मागतो आहोत” असे पत्रकारांनी स्पष्ट सांगितले तरीही या नेत्यांनी विषयांतर करत उत्तर देणे टाळले.
दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने पत्रकारांच्यात चर्चा आणखी रंगली. शिंदे हे भाजप आमदारांच्या संपर्कात असल्याची चर्चा आणि त्याच वेळी तालुकाध्यक्षपदाची तडकाफडकी झालेली नवीन नेमणूक या दोन्ही चर्चा सध्या शहरात जोरदार सुरू आहेत...
दरम्यान यावेळी उपस्थित काँग्रेस नेत्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न दिल्यामुळे... जर आरोप व दावे खरे असतील तर उत्तरे का दिली नाहीत? अशी चर्चा सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment