Monday, October 13, 2025

काँग्रेसचे मुस्लिम (अल्पसंख्याक) समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष झाकीर पठाण म्हणाले... काँग्रेस ने तिकीट दिल्यास मी कराडच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक :

वेध माझा ऑनलाईन।
सध्या शहरात नगराध्यक्ष कोण होणार?याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत चौका चौकात चर्चा सुरू आहेत कोण निवडून येणार? कोण पडणार ? याही चर्चा रंगल्या आहेत असं असताना काँग्रेसचे मुस्लिम समाजाचे (अल्पसंख्याक) पश्चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष युवा नेते झाकीर पठाण  हे काँग्रेस कडून नगराध्यक्षपदाच्या चर्चेत आहेत
काँग्रेस ने तिकीट दिल्यास आपण ही निवडणूक लढणार आणि जिंकणार असेही ते म्हणाले आहेत...निवडून येण्याचे गणित मांडताना ते म्हणाले...काँग्रेस च्या पाठीशी असणाऱ्या हिंदू बांधवांचे सहकार्य त्याच बरोबर मुस्लिम व मागासवर्गीय पडणाऱ्या मतांची बेरीज कॉंग्रेस चा नगराध्यक्ष निवडून येण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे असे पठाण म्हणाले...

झाकीर पठाण हे माजी  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जातात... कराडच्या शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी खूप वर्षे काम पाहिले आहे...  त्यांचे वडील कबड्डी खेळाडू म्हणून ऑल इंडिया चॅम्पियन म्हणून परिचित होते... झाकीर पठाण हे देखील राज्याचे कबबडी प्लेअर म्हणन परिचित आहेत...1986, 87 ला एन एस यु आयला झाकीर पठाण जॉईन झाले...काँग्रेसच्या विचाराला प्राधान्य देत त्यांनी युथ काँग्रेस चे जवळजवळ 12 वर्षे काम पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली केले... झाकीर पठाण यांचे यशस्वी काम पाहून त्यांना अल्पसंख्याक विभागाचे काँग्रेसने जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली...ती जबाबदारी यशस्वी पार पाडत कार्यकर्त्यांची वाढ त्यांनी केली...त्यानंतर पठाण यांची वर्णी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून लागली...
दरम्यान झाकीर पठाण यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे...सर्व धर्मीयांमध्ये त्यांचा सन्मान आहे...कोविड मध्ये त्यांनी मोठं काम केलं आहे...कोविड मध्ये धान्य वाटप करण्यात त्यानी  शहरात पुढाकार घेतला होता... त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या दी कराड सिटी को ऑप क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे ते चेअरमन म्हणून काम पाहत आहेत...पतसंस्थेच्या माध्यमातून ते समाजकार्यात कायमच कार्यरत दिसतात... आतापर्यंत त्यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, तसेच छत्रपती शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ..
त्यांचे कराड दक्षिण व उत्तर मध्ये परिचित लोकांचे मोठे जाळे आहे...त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नुकत्याच झालेल्या आमदारकीच्या निवडणुकीवेळी महत्वाची भूमिका बजावत पहील्या फळीतील काम पाहीले आहे... 
सध्या शहराच्या नगराध्यक्षपदासाठी ओपन आरक्षण पडले आहे... शहरात विविध राजकीय पक्षातून अनेकजण इच्छुक असताना पठाण यांनी काँग्रेस कडून मागितलेली उमेदवारी चर्चेची झाली आहे...
सर्वांच्यात त्यांची प्रतिमा आपला माणूस अशी आहे... आणि म्हणूनच शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा काँग्रेसचे इच्छुक उमेदवार व मुस्लिम समाजाचे नेते म्हणून जोरदार सुरू आहे...

No comments:

Post a Comment