वेध माझा ऑनलाईन।
शिवसेना पक्ष चिन्ह आणि नावाबाबतची सुनावणी १२ नोव्हेंबरपासून सुरु होते आहे. या सुनावणीत नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. २०२२ मध्ये जेव्हा एकनाथ शिंदेंनी बंड केलं तेव्हा त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले. कारण निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं आहे असा निकाल दिला होता. त्यानंतर बऱ्याच तारखा पडल्या पण हे प्रकरण प्रलंबित राहिलं. आता शिवसेना कुणाची याबाबत सुनावणी सुरु होते आहे. दरम्यान याबाबत ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे.
ते म्हणाले...
वारंवार तारीख देण्याची जी प्रक्रिया आहे ती वाईट पातळीला पोहचली आहे. न्यायाला उशीर होणं हा अन्यायच आहे. तारीख देण्याच्या माध्यमातून अन्याय होत असेल, अन्यायाला खतपाणी मिळत असेल तर हा मुद्दा गंभीर आहे. उद्धव ठाकरेंची बाजू संवैधानिक पातळीवर अत्यंत मजबूत आहे. त्यामुळे जो निर्णय आहे तो न्यायालयाने त्वरित द्यावा असं मला वाटतं अस ऍड सरोदे यांनी म्हटले आहे
उद्धव ठाकरेंच्या विरोधात निकाल देताच येणार नाही. कारण त्यांची बाजू मजबूत आहे. जो काही निकाल द्यायचा आहे तो निकाल लवकरात लवकर न्यायालयात द्यावा अशी माझी मागणी आहे. एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल लागला तर काय? हा प्रश्नच काल्पनिक आहे. कारण एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागणारच नाही. हे माझंच म्हणणं नाही ज्यांना कायदा कळतो, संविधान कळतं ते कुणीही हे सांगतील. एकनाथ शिंदेंचा प्रवास ज्यांना कळला आहे त्यांनाही हे माहीत आहे. कारण एकनाथ शिंदेंनी पक्ष चोरला आहे. निष्ठा विकली आहे. त्यांनी संविधानाची मोडतोड करुन अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदही गाजवलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता शून्य आहे. कायदेशीर आणि संवैधानिक पद्धतीने निकाल लागणार असेल तर तो उद्धव ठाकरेंच्या बाजूनेच लागू शकतो असेही ऍड सरोदे यांनी सांगितले
No comments:
Post a Comment