आज मुंबईत माजी नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने यांचा भाजप मध्ये प्रवेश होणार आहे आमदार डॉ अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली या दोघांचा आज प्रवेश होत आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे प्रवेशानंतर मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चहा पान देखील होणार असल्याची माहिती आहे
दरम्यान आज या दोघांच्या प्रवेश होण्याअगोदरपासून मलकापूरचे काँग्रेस नेते मनोहर शिंदे त्याठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर हजर असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांचा आज प्रवेश होणार नाही असेही समजते...
दरम्यान आमदार डॉ अतुल भोसले यांचा करिष्मा कराडमध्ये जोरदार सुरू आहे झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराडकरांनी डॉ भोसले यांना अक्षरशः डोक्यावर घेत तब्बल 40 हजाराच्या फरकाने निवडून देत चमत्कार घडवला त्याची परतफेड करण्यासाठी कटिबद्ध असणारे डॉ भोसले यांनी देखील निवडणुकीत दिलेली आश्वासने निवडून आल्यावर सत्यात उतरवत आपला दिलेला शब्द पाळण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू ठेवला आहे त्याचेच प्रत्यंतर म्हणून अनेक नेते भाजप मध्ये प्रवेशकर्ते होताना दिसत आहेत
मलकापूर येथील काँग्रेस चे काही नगरसेवक भाजप मध्ये थोड्या दिवसापूर्वी गेले तसेच अनेक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामपंचायत सदस्य देखील डॉ अतुल भोसलेंच्या नेतृत्वाला मानून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झाले
कराड शहरातील विविध राजकीय पार्ट्यांमध्ये नगरसेवक म्हणून कार्यरत असणारे अनेकजण कोणत्याही पार्टीत असले तरी दिसतात मात्र डॉ अतुलबाबांबरोबर...आणि..."कृष्णा ट्रस्टवर'...
म्हणजेच डॉ अतुलबाबा यांचे नेतृत्व शहरातील काही राजकीय पार्ट्यांमधील नेत्यांना देखील मान्य असल्याचे यातून दिसून येते...तसेच एखादा नगरसेवक मग तो कोणत्याही पार्टीचा असला तरी त्या नेत्याच्या फ्लेक्सवर झळकतात डॉ अतुल भोसलेच... असा हा करिष्मा सध्या सगळीकडे पहायला मिळतोय...
एकेकाळचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक इंद्रजित गुजर व अप्पा माने आज मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश करत आहेत आमदार डॉ भोसले यांच्यावर विश्वास टाकून भाजप मध्ये सुरू असलेले असे सर्वच भागातील हे भाजप प्रवेश अतुलबाबांवरील लोकांचा असणारा अतूट विश्वास अधोरेखित करत आहे... अशी यानिमित्ताने चर्चा आहे...
दरम्यान आज या दोघांच्या प्रवेश होण्याअगोदरपासून मनोहर शिंदे त्याठिकाणी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मुंबई येथील बंगल्यावर हजर असल्याचे वृत्त आहे. मात्र त्यांचा आज प्रवेश होणार नाही असेही समजते...
No comments:
Post a Comment