Sunday, November 16, 2025

शिवसेना नेते, राजेंद्रसिह यादव यांचा नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल ;

वेध माझा ऑनलाईन
कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक 16 रोजी राजेंद्रसिह यादव यांनी शिवसेनेकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे
कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे त्यांनी आपला अर्ज सादर केला आहे.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवन्त शेलार , शहर अध्यक्ष राजेंद्र माने, प्रमोद वेरणेकर, रुपेश मुळे विजय यादव तसेच शिवसेनेचे  पदाधिकारी कार्यक्रते मोठ्या संख्येने  उपस्थित होते
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री शंभूराज देसाई संपर्क प्रमुख शरद कणसे यांच्या सूचनेनुसार सदर अर्ज दाखल केल्याचे त्यांनी सांगितले 

उद्या १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे. 

No comments:

Post a Comment