Wednesday, November 5, 2025

कराड पालिका निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर एकत्र येण्याचे बाळासाहेब पाटील यांचे संकेत ;म्हणाले...समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता ;

वेध माझा ऑनलाईन
लोकशाही आघाडी शहरातील सर्व प्रभागमध्ये आपले उमेदवार देण्यास सक्षम आहे याबाबद्दल कोणी मनात शंका बाळगण्याचे कारण नाही मात्र समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे... त्यांच्याशी चर्चाही करणार असल्याचे सांगत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी या निवडणुकीत जुळवून घेण्याचे संकेत दिले!
शहराच्या शांततामय सहजीवनासाठी "माझं गाव कराड...मी गावासाठी'... ही संकल्पना आपल्याला राबवायची आहे असे आवाहन करत आपण या निवडणुकीत तरुणांना संधी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले 

कराड पालिकेची निवडणूक जाहीर झाली आहे त्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी सायंकाळी 6 वाजता सारडा लॉन याठिकाणी लोकशाही आघाडीचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री बाळासाहेब पाटील बोलत होते
यावेळी लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील माजी अध्यक्ष सुभाषकाका पाटील माजी नगरसेवक सौरभ पाटील, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष पोपटराव साळुंखे, माजी नगराध्यक्षा ऍड विद्याराणी साळुंखे, सौ हिंगमीरे तसेच सर्व माजी नगरसेवक,नगरसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

माजी मंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले...
कराड गावाला ऐतिहासिक आणि राजकीय परंपरा आहे आपलं गाव म्हणजे कोकण तसेच पंढरपूर सोलापूर भागाला जोडणारा मुख्य भाग आहे...कराड हे मोठ्या दळणवळणाचे केंद्र देखील आहे...पुण्यानंतर शिक्षणाचे माहेरघर म्हणून देखील कराडची ओळख आहे...
स्व यशवंतराव चव्हाण यांचाही वरदहस्त या शहराला मिळाला...हे माझं गाव आहे या भावनेने त्यांनी काम केलं...
कराडची सेवा स्व पी डी पाटील साहेबांनी 42 वर्षे नगराध्यक्ष म्हणून केली...स्व पी डी पाटील साहेबांनी विकासात्मक ड्रीष्टीकोन ठेवत शहराचा लौकिक वाढवला... त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन शहराचा विकास केला...सर्व लोकांचीही त्यांना साथ मिळाली...कालांतराने लोकशाही आघाडी म्हणून आपण पालिका राजकारणात पुढे आलो आणि शहराची सेवा करत आहोत...
आपल्या शहराला कृष्णा कोयनेचा आशीर्वाद आहे त्यामुळे याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अडचण नाही, तसेच प्रदूषणही नाही... शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्था चांगल्या अवस्थेत आहे... पालिकेची इमारत देखील चांगल्या अवस्थेत आहे... 
शहरात काम करत असताना लोकशाही आघाडीने शहराचा विकास  स्व पी डी पाटील साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सातत्याने केला आहे... पूरपरिस्थिती निर्माण झाली असताना तसेच कोरोना काळातही लोकांसाठी लोकशाही आघाडीने चांगले काम केले आहे... 
मतदारसंघ पुनर्ररचनेनंतर मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने कराड उत्तर चे प्रतिनिधित्व केले... मात्र आपल्या शहरासाठी काम करता आले नाही याची खंत मनात होती... शरद पवार साहेबांनी मधल्या काळात मला जिल्ह्याचे पालकमंत्री पद दिले, त्यामुळे मी शहराला भरगोस निधी देऊ शकलो... दुर्दैवाने मंत्रिपद अधिककाळ मिळाले नाही त्यामुळे अधिक काम करता आले नाही तरी त्या कालावधीत मला शहरासाठी भरीव काम करता आले असेही ते म्हणाले... 
समविचारी मंडळी बरोबर आली तर गावाच्या विकासासाठी त्यांना बरोबर घेऊन काम करण्याची आमची मानसिकता आहे... असेही त्यांनी सांगितले ...
काल निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणूका जाहीर केल्या आहेत...दुबार मतदानाचा मुद्दा यानिमित्ताने देशभर गाजला... काल कोर्टात याबाबतची याचिका फेटाळली गेली आणि सायंकाळी 4 वाजता निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली... आता निवडणूक लागली आहे... आपल्याला कालांतराने राजकीय भाष्य करावे लागणार आहे...मात्र सध्या ती वेळ नाहीये... प्रत्येकाने आपला प्रभाग आणि मतदारयाद्या यावर लक्ष केंद्रित करत काम करायचं आहे... निवडणुकीदरम्यान काहीही वावड्या उठतील... त्याकडे लक्ष न देता... आपल्या आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचे आहेत... असेही ते यावेळी म्हणाले...

दरम्यान यावेळी उपस्थित 7 ते 8 मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत यावेळी आपली स्पष्ट मते मांडली...सूत्रसंचालन अडव्होकेट प्रताप पाटील यांनी केले, युवा नेते व राष्ट्रवादी चे शहर अध्यक्ष पोपटराव साळुंखे यांनी आभार मानले

No comments:

Post a Comment