Sunday, November 16, 2025

कराडच्या प्रभाग क्रमांक १२ मधून सौ. तेजस्विनी कुंभार यांचा अर्ज दाखल


वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १२ मधून होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज रविवार दिनांक १६ रोजी सौ. तेजस्विनी कुंभार यांनी आपला उमेदवारी अर्ज शिवसेना व यशवंत विकास आघाडीतून दाखल केला आहे.त्यांनी कराड नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांच्याकडे आपला अर्ज सादर केला.

१७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. २ डिसेंबरला मतदान व ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार १७ नोव्हेंबरपर्यंत रविवार वगळता सकाळी ११ ते २ ऑनलाईन व ११ ते ३ प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिली आहे.

No comments:

Post a Comment