Friday, November 14, 2025

अखेर ठरलं...कराड पालिका निवडणुकीसाठी पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब पाटील येणार एकत्र... भाजप - शिवसेनेला विरोध करण्यासाठी दोन्ही माजी आमदार सरसावले ; नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौरभ पाटील ? माजी आमदार सतेज पाटील यांची या आघाडीसाठी शिष्ठाई ;

वेध माझा ऑनलाईन।
काल शुक्रवारी महाविकास आघाडीच्या गोटात मोठ्या घडामोडी झाल्याचे समजते त्यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यानी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपल्या समर्थकांना समविचारी असणाऱ्या लोकशाही आघाडी शी जुळवून घ्या अशा सूचना केल्या आहेत त्यातच लोकशाही आघाडी च्या उमेदवाराला या निवडणुकीत या होणाऱ्या आघाडीतून नगराध्यक्षपदासाठी समविचाराने उमेदवारी मिळेल असेही ठरल्याचे समजते

अनेक दिवसांपासून शहरात भाजप व शिवसेनेचे उमेदवार कोण?याबाबत चर्चा होती मात्र दोन्ही काँग्रेस चे उमेदवार कोण?ही चर्चा नव्हतीच...मात्र अचानक काल शुक्रवारी महाविकास आघाडी च्या घडामोडी होऊ लागल्या असे कळले त्यात लोकशाही चे नेते मा आ बाळासाहेब पाटील व पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा झाल्याचे समजले त्यासाठी माजी आमदार सतेज पाटील यांनी मध्यस्थीची शिष्ठई केल्याचेही कळते याबाबत पृथ्वीराजबाबा व बाळासाहेब पाटील यांच्यात चर्चा झाली आहे त्यामुळे आता आज- उद्या 2 दिवसात यानुसार ठरल्याप्रमाणे लोकशाहीचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी जाहीर होऊन महाविकास आघाडी आपले उमेदवार जाहीर करणार आहे पृथ्वीराजबाबा व बाळासाहेब पाटील गट कामाला लागलाही आहे असेही समजते 
दरम्यान या आघाडीकडून माजी नगरसेवक सौरभ पाटील यांचे नाव नगराध्यक्षपदासाठी पुढे येणार ? असेही समजते


No comments:

Post a Comment