मागील निवडणुकीत नगराध्यक्ष भाजपचाच होता याहीवेळी भाजपचाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीच्या सर्व लोकांनी प्रयत्न करावा अशी माझी ठाम भूमिका आहे त्यासाठी मी संबंधित प्रत्येकाशी चर्चा करणार आहे
आणि त्यासाठीच मी महायुतीच्या सर्व प्रमुख लोकांशी बोलणार आहे त्यात शिंदे गट असेल अजितदादा गट असेल तसेच शहरातील काही आघाड्या असतील त्यांच्याशी चर्चा करून भाजप चा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी निवडून आणण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत शहरात सलोखा राहिला पाहिजे अशी माझी भूमिका आहे
या मतदार संघाने भाजपवर विश्वास ठेवून मला आमदार म्हणून जबाबदारी दिली आणि माझ्यावर लोकांनी विश्वास ठेवला त्याचप्रमाणे आता महायुतीच्या माध्यमातून भाजपचाच नगराध्यक्ष व्हावा यासाठी माझे प्रयत्न असतील असे ठाम मत आमदार डॉ अतुल भोसले यांनी कराडच्या सर्किट हौस याठिकाणी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले
ते म्हणाले
भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे त्यामुळे पक्षाच्या धोरणानुसार पक्षात येणाऱ्या प्रत्येकाला त्याठिकाणी स्थान देणे गरजेचे आहे त्यानुसार आम्ही पक्षात येणार्याला येथे स्थान देत आहोत मात्र मी त्यापैकी कोणालाही नगराध्यक्ष पदासाठी शब्द दिलेला नाही भाजप मध्ये तशी पद्धत नाही वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेऊन उमेदवार जाहीर करतील आपण सर्वांनी त्याचा प्रचार करून भाजपचा नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment