वेध माझा ऑनलाईन
काल सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने धडक कारवाई करत यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयात छापा टाकला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.दरम्यान सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या भावालाही पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतल्याची माहिती आहे
मिळालेल्या माहितीनुसार,
मुकुंद चरेगावकर यांच्या कराड येथील निवासस्थानी ईडीच्या पथक मंगळवारी पहाटे छापा टाकला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन यशवंत बँकेच्या कराड शाखेत आणलं. 112 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर ईडीच्या अन्य दोन पथकांनी फलटण येथील बँकेची मुख्य शाखा आणि साताऱ्यातील शाखेवर देखील छापे टाकले. तिन्ही ठिकाणी सकाळपासून झाडाझडती सुरू होती. यशवंत बँकेत 112 कोटी 10 लाख 57 हजार 481 रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं यापूर्वीच उघडकीस आलं आहे. तसंच भाजपा नेते, राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष आणि बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह 50 जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीतील लेखापरीक्षण आणि 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2024 दरम्यानच्या लेखापरीक्षण पूर्व कालावधीत जे संचालक कार्यरत होते. त्यांच्यावर अपहाराचा ठपका ठेवला आहे.
दरम्यान ईडी अधिकाऱ्यांनी काल प्रथम बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या कराडच्या निवासस्थानी कारवाई सुरू केली. त्यानंतर ईडी पथकाने थेट यशवंत बँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मोर्चा वळवला. सकाळी बँकेचे कार्यालय सुरू होताच बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली.कारवाईदरम्यान महत्त्वाची कागदपत्रे, आर्थिक नोंदी, कर्ज प्रकरणांशी संबंधित फाईल्स व डिजिटल रेकॉर्डची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे बँकेचे कामकाज काही काळासाठी पूर्णतः ठप्प झाले असून, परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
१ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीतील लेखापरीक्षण तसेच १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०२४ या लेखापरीक्षणपूर्व कालावधीत कार्यरत असलेल्या संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.या प्रकरणी पुण्याचे शासकीय सनदी लेखापाल मंदार देशपांडे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसार, ९ ऑगस्ट २०१४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेचे अध्यक्ष, संचालक व कर्मचाऱ्यांनी परस्पर संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बँकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले.११२ कोटी १० लाख ५७ हजार ४८१ रुपयांचा कथित अपहार केल्याचा गंभीर आरोप आहे.
बोगस कर्जप्रकरणे व बनावट कागदपत्रांचा वापर फिर्यादीत नमूद केल्यानुसार,बोगस कर्ज प्रकरणे उभी करण्यात आली,खोटी व बनावट कागदपत्रे तयार करण्यात आली,तारण न घेता हेतुपुरस्सर कर्ज वाटप करण्यात आले,जुनी थकीत खाती बंद दाखवून नवीन खाती उघडण्यात आली,
निधीचा उद्देशबाह्य वापर करून तो तृतीय पक्षांकडे वळवण्यात आला,तसेच दस्तऐवजांत फेरफार व खोट्या नोंदी करून बँकेच्या निधीचा गैरविनियोग करण्यात आला, असे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.या प्रकरणात यशवंत बँकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर चरेगावकर, ३६ संचालक, ३ कार्यकारी अधिकारी, २ व्यवस्थापक व अन्य ९ जणांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment