वेध माझा ऑनलाइन।
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विविध भेटीगाठींवर भाष्य केले. शिंदे यांनी संघाच्या कार्यालयास आणि दीक्षाभूमीला दिलेल्या भेटी या सामाजिक सलोखा राखण्याच्या पक्षाच्या भूमिकेचा भाग असून, त्या नव्या नाहीत असे शिरसाट यांनी सांगितले.दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील मुख्यमंत्रीपदाविषयी प्रकाश आंबेडकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या राजकीय भाकितांना शिरसाट यांनी फेटाळले.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या जागावाटपाबद्दल बोलताना, अंतर्गत सर्व्हेनुसार शिवसेना १३५ जागांवर लढू शकते असे त्यांनी नमूद केले. शिवसेना आणि भाजपमध्ये समाधानकारक जागावाटप वरिष्ठ नेते, म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भविष्यातील मुख्यमंत्रीपदाविषयी प्रकाश आंबेडकर आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या राजकीय भाकितांना शिरसाट यांनी फेटाळले. अशा गोष्टी राजकारणात घडत नसतात आणि वरिष्ठ पातळीवरील निर्णय जाहीरपणे चर्चिले जात नाहीत असे ते म्हणाले.
No comments:
Post a Comment