Friday, January 9, 2026

कराड पालिकेतील लोकशाही आघाडीचे गटनेते म्हणून नगरसेवक सुहास पवार फायनल ! लवकरच होणार जाहीर ! ;

वेध माझा ऑनलाइन।
कराडचे नगरसेवक सुहास पवार हे लोकशाही आघाडीचे गटनेते म्हणून निश्चित झाले असल्याचे  समजते तसे पार्टीकडून पत्र देखील सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती आहे अधिकृत घोषणा लवकरच होईल असेही समजते

सुहास पवार हे शहरातील नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोन मधून निवडून आले आहेत सलग 15 वर्षे त्यांचे या प्रभागावर वर्चस्व आहे त्यांना प्रशासनिक कामाचा चांगला अनुभव आहे त्यांनी पालिकेत विविध सभापतीपदावर देखील काम केले आहे
नगरसेवक सुहास पवार हे युवकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे युवा नेते म्हणून परिचित आहेत माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे ते निष्ठावन्त म्हणून ओळखले जातात कोणाला कसलीही अडचण असेल तर ते व त्यांचे कार्यकर्ते मदतीसाठी नेहमीच पुढे असतात त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा त्यांना व पार्टीला मतदाराच्या रूपाने नेहमीच झालेला दिसून आला आहे सुहास पवार यांचा संपर्क सर्वच समाजात खूपच मोठा असल्याने त्यांच्या आयोजित प्रत्येक कार्यक्रमाला शहरातील हजारो लोकांनी हजरी लावत त्यांच्यावरील प्रेम व्यक्त केलेले कायमच दिसले आहे 
...गेली 15 वर्षे सुहास पवार प्रभाग क्रमांक 2 मधील जनतेची सेवा करत आहेत नुकत्याच झालेल्या शहरातील पालिका निवडणुकीसाठी त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या  उमेदवारीसाठी तयारी केल्याचे बोलले जात होते त्यांचा पालिकेतील कामाचा 3 टर्मचा अनुभव तसेच कामकाजाचा अभ्यास व त्यांच्या सिनिएरिटीचा विचार करून त्यांना यावेळी पार्टीचे गटनेते म्हणून निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती आहे
लोकशाही पार्टीकडून तसे पत्र देखील सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्याची माहिती मिळत आहे अधिकृत घोषणा लवकरच होईल असेही समजते

No comments:

Post a Comment