Sunday, January 11, 2026

कराडमध्ये जे कार्यकर्ते झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत उभे होते... आणि पराभूत झाले... त्यांना स्वीकृत म्हणून संधी मिळणार नाही ? ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
कराड पालिकेत स्वीकृत म्हणून कोण येणार ही चर्चा प्रत्येक पार्टीत जोर धरू लागली असतानाच आता याबाबत एक महत्वाची माहिती मिळाली आहे ती अशी की, भाजप सहित लोकशाही व यशवन्त आघाडी मधील जे कार्यकर्ते झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे होते... आणि पराभूत झाले आहेत... त्यांना आता पुन्हा स्वीकृत म्हणून संधी मिळणार नाही ? असे खात्रीलायक समजते...

कराड पालिकेत स्वीकृत नगरसेवकांसहित विशेष समित्या तसेच उपनगराध्यक्षपदासाठी लवकरच निवड प्रक्रिया होईल... त्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत... खासकरून स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रत्येक पार्टीत अनेकजण इच्छुक असल्याचे दिसते... 

मात्र ज्यांना यावेळी निवडणुकीत उमेदवार म्हणून संधी  मिळाली नाही त्यांना आतातरी स्वीकृत म्हणून संधी मिळावी अशी त्या सर्वाची अपेक्षा आहे असे दिसते तर दुसरीकडे पार्टीसाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय प्रामाणिक काम करणाऱ्या  कार्यकर्त्याची देखील यावेळी आपल्याला स्वीकृत म्हणून संधी मिळावी अशी अपेक्षा असल्याचेही दिसते

त्यानुसार आता शहरातील प्रत्येक पार्टीच्या नेत्याने झालेल्या पालिकेच्या निवडणुकीत जे उमेदवार म्हणून उभे होते... आणि ते पराभूत झाले... त्यांना आता पुन्हा स्वीकृत म्हणून संधी मिळणार नाही असे ठरवले असल्याचे खात्रीलायक समजते... 
कारण उमेदवारी पण त्यांनाच द्यायची... आणि पराभूत झाले तरी परत स्वीकृत त्यांनाच करायचे आणि कार्यकर्त्यांची आणखी नाराजी ओढून घ्यायची हे पार्टीच्या भविश्यासाठी परवडणारे नाही... असा त्यामागचा हेतू असल्याचीही चर्चा आहे...

त्यामुळे ज्यांना यावेळी उमेदवारी देता आली नाही... पण तो कार्यकर्ता पार्टीशी प्रामाणिक आहे... अशा नाराज झालेल्या कार्यकरर्त्याना  स्वीकृत ची संधी देऊन त्यांची नाराजी दूर करण्याची संधी नेत्यांना यानिमित्ताने उपलब्ध झाली आहे अशीही चर्चा आहे... 

No comments:

Post a Comment