Tuesday, January 20, 2026

शिंदे गटाचा गेम होणार ? मुंबईत भाजपचा महापौर होणार?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा निकाल 16 जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत बहुसंख्य महापालिकांत भाजपा हाच सर्वात मोठा पक्ष म्हणून नावारुपला आला. परंतु कल्याण डोंबिवली, मुंबई, उल्हासनगर यासह जळगाव अशा काही महापालिकांत महायुतीचा महापौर होण्याची शक्यता आहे. परंतु या सर्व महानगरपालिकां पैकी मुंबईच्या महापौरपदाची सगळीकडे चर्चा रंगली आहे. इथे कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने महापौरपदावर कोण विराजमान होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातही शिंदे गटाकडून भाजपाला अडीच वर्षे महापौरपदाची मागणी केली जात असल्याचे सांगितले जात असल्यामुळे महापौरपदाच्या निवडीचा प्रश्न जास्तच अडचणीचा ठरल्याचे सांगितले जात आहे. परंतु आता भाजपाचे वरिष्ठ नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे. त्यांनी केलेल्या विधानानंतर आता भाजपाच महापौर बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रकांत पाटील हे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी एका वहिनीच्या पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना मुंबईच्या महापौरपदाविषयी विचारण्यात आले. तसेच कोणत्या पक्षाचा महापौर असेल, असे विचारताच देवेंद्र फडणवीस जो-जो प्लॅन तयार करतात, तो यशस्वी होतोच. त्यांचा कोणताही प्लॅन अयशस्वी होत नाही. मुळात महापौरपदाविषयी चर्चा का चालू आहे, हेच मला समजत नाही. कारण भाजपा हा सर्वात मोठा पक्ष असल्याचेही सरळ आणि स्पष्ट आहे, असे थेट विधान करत महापौर हा भाजपाचाच होऊ शकतो, असे संकेत दिले.

No comments:

Post a Comment