मार्केटयार्ड गेट नंबर १ पासून ते बैल बाजार रोड कराड शहर हद्दीपर्यंत रस्त्यावर खूप खड्डे पडलेले असून, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे, सदर रस्ता नवनिर्मिती प्रस्तावित आहे. तोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर बुजवून होत असलेले अपघात टाळण्याबरोबर नागरिकांना होत असलला मनस्तापही टाळावा अशी विनंती त्याच परिसरातील युवा नेते व माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे खंदे समर्थक सतिश भोंगाळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे
दरम्यान याठिकाणी असलेले खड्डे लवकरात लवकर बुजवुन घेण्यात येतील असे आश्वासन नगराध्यक्ष यादव यांनी यावेळी दिले केले याप्रसंगी युवा नेते राकेश शहा, संदीप मुंढेकर आदी उपस्थित होते.
सतिश भोंगाळे हे आमदार बाळासाहेब पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित आहेत त्यांनी नुकतीच झालेली शहराची नगरपरिषदेची निवडणूक लोकशाही आघाडीच्या माध्यमातून लढवली आहे लोकशाही आघाडी च्या माध्यमातून त्यांचे शहर व प्रभागात सामाजिक कार्य चालूच असते त्याचा कामाचा एक भाग म्हणून त्यांनी गेट नम्बर 1 ते बैल बाजार परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत आणि त्यानिमित्ताने त्याठिकाणी होणारे लहान मोठे अपघात टाळण्यास त्यामुळे मदत होणार आहे असे त्यांनी आज कराडच्या नगराध्यक्षाना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
No comments:
Post a Comment