वेध माझा ऑनलाइन।
गुजरातमधून आलेल्या नार्कोड्रग्ज पथकाने सातारा जिल्ह्यातील दुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या एका गावात केलेल्या कारवाईने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजली. या कारवाईत सुमारे 55 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्जचा साठा सापडल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून दिली जात आहे.. आयपीएस रँकचे तीन अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते. हे सर्व अधिकारी आणि त्यांची टीम ही गुजरातमधून आल्याची माहिती आहे. त्यांनी स्थानिक आणि बिहारच्या काही युवकांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करताना पुसटशी कल्पनाही या सातारा पोलिसांना होऊन दिली नाही. इतकी गोपनीयता या पथकाने पाळली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पाचपुतेवाडी या ठिकाणी असलेल्या एका मोठ्या शेडवर गुजरात येथून आलेल्या डी आर आय विभागाच्या पथकाने या शेडचा मालक हा बाबा मोरे याला ताब्यात घेऊन पुढची कारवाई सुरू केली. या शेडमध्ये सुमारे 55 कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज बनवण्याचे सर्व साहित्य जप्त केल्याचं सांगितलं जात आहे.
No comments:
Post a Comment