Wednesday, January 28, 2026

काल अजितदादांनी मंत्रालयात आलेल्या सर्व फाईल्स क्लिअर केल्या ; काल अजितदादांनी केलेली कामे व त्या कामाचा काय आहे तपशील..?

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचं आज विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवार मुंबईहून बारामतीमध्ये येत असताना आज (28 जानेवारी) अजित पवार यांच्या विमानाचा लॅंडिंगदरम्यान भीषण अपघात झाला. विमान लँडिग होतानाच अपघात झाला आणि विमानाने पेट घेतला. अपघातानंतर विमानाचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते.  अपघात झाला  त्यावेळी अजित पवार यांच्यासह विमानात पाच जण होते. विमानात अजित पवार आणि त्यांचे सुरक्षारक्षक देखील होते. विमानाचा अपघात झाला त्यानंतर अवघ्या काही वेळातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर आली आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अचानक समोर आलेल्या या घटनेने सर्वजण हळहळ व्यक्त करत आहेत. काल (मंगळवारी, ता २७) अजित पवार कॅबिनेट बैठकीसाठी अजित पवार मुंबईला गेले होते, ते मुंबईतून बारामतीत आल्यानंतर हा अपघात झाला आहे. तर काल त्यांनी मुंबईत केलेली कामे आणि त्यांचा तपशील देखील समोर आला आहे.

अजित पवारांनी काल काय काम केली...
अजित पवार कायमच अॅक्शन मोडमध्ये दिसायचे. पहाटेच्या सुमारास ते आपल्या कामाला सुरूवात करायचे. वेळेवर न येणाऱ्या अधिकऱ्यांना ते अनेकदा झापायचे. काल त्यांनी मुंबईतील केलेल्या कामाचा तपशील समोर आला आहे.
मुंबईत असले की अजितदादा सकाळी 8.30 वाजता ते मंत्रालयात येऊन कामकाजाला सुरुवात करत असत.
 
कालही सकाळी 8.30 वाजता अजित पवार मंत्रालयात हजर झाले.
आलेल्या सर्व फाईल्स त्यांनी क्लिअर केल्या.

वित्त विभागाचे सचिव, महसूल विभागाचे सचिव, यांच्या समवेत या आर्थिक वर्षात राज्याला मिळालेल्या उत्पन्नाचा आढावा त्यांनी घेतला, उत्पन्न वाढीच्या सूचना सर्व सचिवांना दिल्या. ही बैठक दीड तास चालली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांसमवेत कॅबिनेट बैठकी संदर्भात चर्चा करून ते कॅबिनेट बैठकीला गेले.

कॅबिनेट बैठक,पायाभूत सुविधा समिती बैठकीला ते उपस्थित राहिले.

त्यानंतर पुन्हा दालनात गेले. तिथे मंत्री चंद्रकांत पाटील व त्यांची चर्चा झाली. दुपारी 2.30 वाजता ते देवगिरीकडे रवाना झाले.
शेवटच्या दिवशीही राज्याचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यासाठीच ते कार्यरत होते.

No comments:

Post a Comment