Monday, January 26, 2026

उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत ;

वेध माझा ऑनलाइन।
 शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे हे तुम्हाला लवकरच आमच्या सोबत दिसतील. आमच्या सोबत येण्याची त्यांची प्रोसेस सुरू झाली आहे, असा दावा उद्योगमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी केलाय. उदय सामंत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक खळबळजनक दावा केलाय.  
संजय राऊत म्हणाले की, अंबादास दानवे हे कडवट शिवसैनिक आहेत. ते गेल्या अनेक वर्षांपासून एकाच पक्षात आहेत. त्यांनी तीन-चार पक्ष बदलले नाहीत. ते आमचे सहकारी आहेत. या दाव्यांना अर्थ नाही. स्वतः उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये चालले आहेत. दावोसमध्ये काय चर्चा झाली हे तुम्हाला माहिती आहे का? असा दावा त्यांनी केला. 

No comments:

Post a Comment