Wednesday, September 23, 2026

स्मृती इराणी व विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी, भाजपची राज्य प्रभारींची नवी यादी जाहीर

वेध माझा ऑनलाईन।
भाजपने नुकतीच राज्य प्रभारी आणि सहप्रभारींची नवीन यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्मृती इराणींना हरियाणा-छत्तीसगडची, तर विनोद तावडेंना उत्तर प्रदेशची जबाबदारी मिळाली आहे. महाराष्ट्रासाठी वैजयंत जय पांडा यांची नियुक्ती झाली आहे. सुनील बन्सल पश्चिम बंगाल-तेलंगणा सांभाळतील. पक्षाच्या आगामी रणनीतीसाठी ही महत्त्वपूर्ण फेरबदल आहेत.
भारतीय जनता पक्षाने राज्य प्रभारी आणि सहप्रभारींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये स्मृती इराणी यांच्याकडे हरियाणा आणि छत्तीसगडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी वैजयंत जय पांडा यांच्या नियुक्ती झाली असून अमित मालवीय, सदानंद शेर्ट तनावाडे आणि कमलजीत सहरावत हे सहप्रभारी आहेत.

No comments:

Post a Comment