Wednesday, September 23, 2026

दानपट्ट्याच्या प्रात्यक्षिकांनी श्री बाल गणेश मंडळाची विसर्जन मिरवणुकीला सुरुवात; दीपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाची शिस्तबद्ध वाटचाल; दिपकदादा पाटील यांच्या रूपाने सोमवार पेठ पाण्याची टाकी परिसरात नव्या नेतृत्वाचा उदय ! ;

वेध माझा ऑनलाइन।
सोमवार पेठेतील नवीन पाण्याची टाकी परिसरातील श्री बाल गणेश मंडळाच्या गणरायाची विसर्जन मिरवणूकिला आज सायंकाळी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात सुरुवात झाली मिरवणुकीदरम्यान मुला-मुलींनी सादर केलेल्या दानपट्टा प्रात्यक्षिकांनी उपस्थितांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे

कन्याशाळा, चावडी चौक मार्गे पारंपरिक पद्धतीने ही मिरवणूक पुढे सरकत प्रीतीसंगम घाटावर पोहोचणार आहे. याठिकाणी भक्तिमय वातावरणात श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येईल आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन मिरवणुकीची सांगता करण्यात येईल

दरम्यान, गणेश प्रतिष्ठापनेपासून विसर्जनापर्यंतच्या कालावधीत श्री बाल गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यावर्षी दिपकदादा यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाने रक्तदान शिबिर, दंत तपासणी शिबीर, तसेच विविध आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते दीपकदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळाच्या कार्याला शिस्तबद्ध स्वरूप मिळाले असून, सामाजिक बांधिलकी जपत मंडळाची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

दीपकदादा पाटील यांनी मंडळाची धुरा सांभाळल्यानंतर सोमवार पेठेतील पाण्याच्या टाकी परिसरातुन सामाजिक आणि विधायक उपक्रमांना चालना मिळत असल्याचे चित्र आहे. 

त्यांच्या नेतृत्वातून सोमवार पेठ पाण्याची टाकी परिसरात नव्या आशेचा किरण निर्माण होत असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहेत यानिमित्ताने दिपकदादा पाटील यांच्या रूपाने सोमवार पेठ पाण्याची टाकी परिसरात नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे त्यामुळे तेथील नागरिक आता आशावादी झाले आहेत त्याठिकाणचे आत्तापर्यंत मरगळलेले सामाजिक वातावरण दिपकदादा या योग्य नेतृत्वामुळे आता प्रफुल्लित झाल्याचे दिसत आहे 

दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जनानंतर महाप्रसादाचे आयोजन मंडळाचे सदस्य आशुतोष पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या महाप्रसादाचा लाभ परिसरातील नागरिक व भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे


No comments:

Post a Comment