गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवजवान गणेश मंडळ, आझाद चौक यांच्या वतीने साकारण्यात आलेल्या ‘नरसिंह अवतार’ या जिवंत देखाव्याला कराडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, देखावा पाहण्यासाठी दररोज रेकॉर्डब्रेक गर्दी होत आहे. विशेषतः भगवान नरसिंहांनी भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी घेतलेला अवतार आणि हिरण्यकश्यपूचा केलेला वध हा प्रसंग पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक परंपरा, संस्कार आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न नवजवान गणेश मंडळाने केला असून, ‘नरसिंह अवतार’ हा जिवंत देखावा कराड शहरातील गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.
वैभव भोसले, अतुल पाडळे, रितेश नलवडे, कृष्णा काटवटे, श्रीधर मुळे, सिद्धप्रसाद मुळे, अंकुश नलवडे, ज्ञानेश्वर भस्मे, विनायक काटकर, बाल कलाकार रुद्र नलवडे यांच्या या देखाव्यात प्रमुख भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment