Sunday, December 5, 2021

राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 डिसेंबरला किल्ले रायगडाला देणार भेट ; जययत तयारी सुरू ; खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती कोविंद यांना दिले होते रायगड भेटीसाठी निमंत्रण...

वेध माझा ऑनलाइन
कराड
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सात डिसेंबरला रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरु आहे. खासदार संभाजी छत्रपती यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचं निमंत्रण दिलं होतं. राष्ट्रपतींच्या भेटीमुळे सुरक्षेच्या कारणामुळे 3 ते 7 डिसेंबरपर्यंत पर्यटकांना किल्ल्यावर येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे. 

दरम्यान त्यांच्या या दौऱ्यावेळी आजूबाजूच्या परिसरामध्ये पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात येणार आहे. पर्यटकांना आजूबाजूच्या परिसरातही प्रवेश नाकारण्यात येणार आहे. पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनानं पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच याबाबतचे आदेश जारी केले होते. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रायगडावर लगबग सुरु आहे.  दरम्यान,राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते.  25 वर्षांपूर्वी किल्ले रायगडावरील होळीच्या माळावर हेलिपॅड होते. मात्र 1996 साली हा हेलिपॅड काढून टाकण्यात आला होता.

No comments:

Post a Comment