कराड
आज येथील प्रितिसंगम घाट परिसरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत कृष्णाकाठ सप्ताहाच्या निमित्ताने कृष्णा नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली
माजी वसुंधरा अभियानाच्या पार्श्वभूमीवर कराड नगरपरिषद व समर्थ भारत परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने 29 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत "कृष्णाकाठ सप्ताह" चे आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्ताने आज
प्रितीसंगमावरील कृष्णा-कोयना नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली.यावेळी नगरसेवक गुंड्याभाऊ वाटेगावकर व सौरभ पाटिल तसेच शहरातील अन्य मान्यवर सहभागी झाले होते.
दरम्यान,येथील पालिकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक "इव्हेंट' ला नगरसेवक सौरभ पाटील व गुंड्याभाऊ वाटेगावकर नेहमीच उपस्थित दिसतात मात्र बाकीचे नगरसेवक व नेते म्हणवणारे का फारसे उपस्थित राहत नाहीत ? अशी चर्चा अशावेळी हमखास होत असते... आजही नदी पात्राच्या स्वच्छतेवेळी ती चर्चा झालीच...
No comments:
Post a Comment