Tuesday, January 11, 2022

मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड बाधितांच्या संख्येत घसरण ; लाट ओसारतेय ?

वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोविड बाधितांच्या संख्येत घसरण झाली आहे. मुंबईत कोरोना बाधितांच्या पॉझिटिव्हिटी रेट 28 टक्के होता तो मंगळवारी घसरुन 18.7 टक्यांवर पोहोचला आहे. याच संदर्भात महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी म्हटलं, मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आणि आता लवकरच रुग्णसंख्या आटोक्यात येऊ शकते. या आकडेवारीत आम्ही आणखी घसरण होण्याची अपेक्षा करतो.

डॉ शशांक जोशी पुढे म्हणाले, "गेल्या तीन ते चार दिवसांत आम्ही एक ट्रेंड पाहिला आहे ज्यामुळे तीन कारणांमुळे रुग्णांच्या संख्येत कमी होऊ शकते. पहिलं कारण म्हणजे बरेच नागरिक आता घरी आहेत आणि ते सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत, त्यांची टेस्ट होत नाहीये. दुसरं कारण असं की, बरेच नागरिक स्वत: टेस्टिंग करत आहेत आणि त्यासंदर्भातील माहिती ते देत नाहीयेत. तिसरं कारण असं की, आपल्याला बाधितांची अचूक संख्या माहिती नाहीये."

No comments:

Post a Comment