Saturday, February 5, 2022

सामान्य परिस्थितीतून कुटुंबाची जबाबदारी पेलणाऱ्या लतादीदींची संपत्ती किती आहे पहा...

वेध माझा ऑनलाइन - लतादीदी गाण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहेत पण त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल फारशी माहिती तुम्हाला नसेल. त्यांची एकूण नेटवर्थ किती आहे असं विचारलं तर तुम्हाला तुम्हाला उत्तर देता येणार नाही. त्यांची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती 368 कोटी रुपये आहे.

स्वरलता, गानकोकिळा, दैवी आवाजाची देणगी लाभलेली गानसरस्वती... अशा अक्षरशः शेकडो अद्वितीय विशेषणांनी नावाजलेल्या महान गायिका लता मंगशकर यांनी वयाच्या 92 व्या वर्षी या जगाचा आज कायमचा निरोप घेतला. 
अगदी सामान्य परिस्थितीतून अपार मेहनतीने त्यांनी कष्ट करून आघाडीची पार्श्वगायिका म्हणून स्थान निर्माण केलं. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीत अनभिषिक्त गानसम्राज्ञी म्हणून नाव कमावलं. सर्व प्रकारची गाणी लतादीदी गायल्या आहेत. लतादीदी मंगेशकरांच्या घरातलं थोरलं अपत्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं या आपल्या थोरल्या लेकीवर जीवापाड प्रेम. तिच्यातली गानप्रतिभाही त्यांनी खूप लहानपणीच हेरली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून लतादीदी अगदी लहानपणापासून आपसूकच ऐकून ऐकून ताना घेत असत. त्यानंतर त्यांनी रीतसर गाण्याचं शिक्षण घेतलं आणि लहानपणीच संगीत नाटकातून पं. दीनानाथ मंगेशकरांची ही लेक व्यासपीठावर वावरू लागली.दुर्दैवानं पित्याचं छत्र बालपणीच हरपलं आणि अवघ्या 13 व्या वर्षी छोट्या लताची लतादीदी झाली. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ या पाठच्या भावंडांची पाठराखण करत आणि कुटुंबाची जबाबदारी स्वीकारत गायनाचा व्यवसाय म्हणून विचार करू लागली. 1942 मध्ये मास्टर विनायक यांच्य नवयुग सिनेमासाठी त्यांचं गाणं सुरू झालं, ते अगदी नव्वदीपर्यंत अविरत सुरू होतं. 1945 मध्ये लतादीदी मुंबईत आल्या आणि पार्श्वगायनाचं क्षेत्र त्यांच्यापुढे खुलं झालं. मग त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. अक्षरशः हजारो गाणी त्यांनी गायली. हिंदी-मराठीच नव्हे तर 36 भारतीय भाषांतली गाणी लतादीदींनी गायली. 
अत्यंत सामान्य परिस्थितीमधून इथपर्यंत आलेल्या त्यांची एकूण नेटवर्थ किती आहे असं विचारलं तर तुम्हाला तुम्हाला उत्तर देता येणार नाही. त्यांची नेटवर्थ म्हणजे एकूण संपत्ती 368 कोटी रुपये आहे.

No comments:

Post a Comment