Friday, March 4, 2022

धोका अजून टळलेला नाही ; ओमायक्रॉनचे 200 हून अधिक रुग्ण सापडले ; या रुग्णांची नोंद पुणे महापालिकेत झाल्याची माहिती आली समोर...

वेध माझा ऑनलाइन - गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने लोकांमध्येही कोरोनाची भीती कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणीही नागरिक मास्क लावणं टाळताना दिसत आहे. मात्र आज राज्य सरकार आमि आरोग्य विभागाने चिंता वाढवणारी आकडेवारी शेअर केली आहे. आज राज्यात 525 नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद केली आहे. तर ओमायक्रॉनचे  200 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. ही रुग्णांची नोंद पुणे महापालिकेत झाल्याचं सांगितलं जात आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या दैनंदिन अहवालानुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ९९२ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१५,७११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०७ टक्के इतके आहे. आज राज्यात ५२५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तर ९ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,८१,३८,१८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६७,९१६ (१०.०७ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २८,८७८ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत, तर ५९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

No comments:

Post a Comment