Saturday, March 5, 2022

विकेंड नंतर राज्यात कोसळणार पाऊस ...कुठे कुठे पडणार पाऊस?

वेध माझा ऑनलाइन - सध्या नैऋत्य बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या काही तासांत हवेच्या कमी दाबाचं हे क्षेत्र आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच पुढील 36 तासांत हे क्षेत्र तामिळनाडूच्या किनारपट्टीवर येऊन धडकण्याची शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. विकेंडनंतर कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात अनेक ठिकाणी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सोमवारी (07 मार्च) नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आणि अमरावती या आठ जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. याशिवाय पालघर, पुणे, ठाणे आणि अहमदनगर जिल्ह्यात ढगाळ हवामान राहणार असून येथेही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. यानंतर मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment