वेध माझा ऑनलाइन -ओ बी सी आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे कोर्टाने दिलेल्या निर्णयावरून यापुढे ओ बी सी ना आरक्षण मिळेल असे अजिबात वाटत नाही यामुळे पुढील होणाऱ्या निवडणुका आरक्षणाशिवाय होतील असे भाकीत ओ बी सि सेल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी आज येथील पत्रकार परिषदेत केले शेवटची आशा म्हणून यासंदर्भात आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत असेही ते म्हणाले
ओ बी सी आरक्षणाविषयो आपली भूमिका व माहिती देण्यासाठी त्यांनी आज येथील सर्किट हौस येथे पत्रकार परिषद आयोजित केली होती यावेळी माजी नगरसेवक अशोकराव पाटील तसेच ओ बी सी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आणि राष्ट्रवादी व शिवसेनेने ओबीसी ना आरक्षण मिळण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत असा गंभीर आरोपही केला
माळी पुढे म्हणाले राज्य सरकार व केंद्र सरकार या दोघांनीही ओ बी सी आरक्षणाबद्दल उदासीनता दाखवली आहे राज्य सरकारने वरवर माहिती देणारा डेटा न्यायालयात दिला त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी योग्य ती दिशा न्यायालयात मिळाली नाही पर्यायाने कोर्टाने तो देटा फेटाळला
केंद्रानेही मनमोहन सिंग यांनी दिलेला डेटा परिपूर्ण असूनही तो दिला नाही राज्य सरकार आणि केंद्राच्या कुचकामी व बेजबाबदार धोरणामुळे ओ बी सी आरक्षण रखडले गेले
आम्ही रत्नागिरी , पुणे येथे रस्त्यावर उतरून आंदोलने केली मोर्चे काढले पुढे जाऊन नाशिक विदर्भात आम्ही मोर्चे काढणार आहोत राष्ट्रपतींना भेटणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणे एवढाच पर्याय आमच्यापुढे आहे आमच्यावर अन्याय झाला आहे एप्रिल मे मध्ये होणाऱ्या येथील स्थानिक निवडणुकीत ओ बी सी आरक्षण नसेल आम्ही काँग्रेस म्हणून 27 टक्के पक्षांतरगत आरक्षण देणार आहोत आमचे नेते नाना पटोले यांनी तसे जाहीरही केले आहे राष्ट्रवादी आणि शिवसेनेने ओ बी सी ना आरक्षण मिळण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत असा गंभीर आरोपही माळी यांनी यावेळी केला
No comments:
Post a Comment