वेध माझा ऑनलाइन - चीनच्या वुहान शहरात 2019 मध्ये सापडलेल्या कोरोनामुळे अवघ्या जगभरात खळबळ माजली होती, मात्र आता ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणाने उदयास आलेल्या नव्या व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय आरोग्य आयोगाने (WHO) सांगितले की, 2021 च्या तुलनेत यावर्षी देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची आतापर्यंत नोंदवलेली प्रकरणे सर्वाधिक आहेत. तसेच ओमिक्रॉन आणि डेल्टाच्या मिश्रणामुळे एक नवीन व्हेरिएंट निर्माण होऊ शकतो, जो चौथ्या लाटेसाठी जबाबदार असेल.
एका दिवसात 1337 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
चीनमधील कोरोनाच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले, तर चीनमध्ये एका दिवसात 1337 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. रॉयटर्सच्या मते, चीनमध्ये गेल्या वर्षी एकूण 8378 प्रकरणे नोंदवण्यात आली होती. त्याच वेळी, 2022 च्या तीन महिन्यांत 9 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बीजिंग, शांघाय, शेडोंगसह इतर अनेक राज्यांतून नव्या रुग्णांची नोंद समोर आली आहेत. एका अहवालानुसार, चीनमधील वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा चिनी अर्थव्यवस्थेला धक्का बसू शकतो. कारण सध्या 30 दशलक्षाहून अधिक नागरिक लॉकडाऊनमध्ये घरामध्ये क्वारंटाईन झालेले आहेत.
हाँगकाँगमध्ये 27,647 नव्या रुग्णांची नोंद
हुवावे आणि टेन्सेट या दोन मोठ्या चिनी कंपन्यांचे मुख्य कार्यालय शेन्झेन येथे आहे. हे शहर हाँगकाँगच्या सीमेला लागून आहे, जिथे आधीच मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान हाँगकाँगमध्ये परिस्थिती आणखीनच बिकट होत चालली आहे, जिथे अधिकाऱ्यांनी कोरोनाव्हायरसच्या 27,647 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हाँगकाँगमध्ये आणखी 87 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्यानंतर संसर्गामुळे मृतांची संख्या 3,729 झाली आहे.
शहराबाहेर न जाण्याच्या सूचना
नवीन रुग्णांचाी नोंद झाल्यानंतर बीजिंगमधील प्रशासनाने तिथल्या नागरिकांना अत्यावश्यकतेशिवाय शहराबाहेर न जाण्याच्या सूचनाही लोकांना देण्यात आल्या आहेत. शांघायमध्ये शाळा-उद्याने बंद राहिली, तर बीजिंगमध्ये निवासी भागात प्रवेशावर बंदी घालण्यात आली.
No comments:
Post a Comment