वेध माझा ऑनलाइन - महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतुन पर्यावरण संवर्धन जनजागृती साठी सुरु करण्यात आलेल्या “माझी वसुंधरा”२.० या स्पर्धेमध्ये कराड नगरपरिषदेच्या संपूर्ण अधिकारी व कर्मचारी वर्गाने सांघिक कामगिरी करत राज्यांत “प्रथम क्रमांक” मिळविला. त्यानिमित्ताने कराड चे मुख्याधिकारी रमाकांत डाके नोडल आफिसर आर. डी. भालदार व जलअभियंता ए. आर. पवार तसेेेच सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना “गौरवपत्र” देवून येेथील डिजेएस सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्यावतीने नुकतेेेच सन्मानित करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धवल जाधव, उपाध्यक्ष शंकर साळुंखे, द न्युज लाईन चे संपादक प्रमोद तोडकर, व शेतकरी नेते अनिल घराळ आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment