वेध माझा ऑनलाइन - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार ईडी चा वापर करतय असे सांगत हे सरकार ईडी चा गैरवापर करत असल्याचा आरोप केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आज येथे खोडून काढला... ज्याची चौकशी ईडी करते आणि... जो दोषी ठरतो त्यांने... आपली बाजू निर्दोष सिद्ध करावी असे आव्हान देत त्यांनी यावेळी ईडीच्या कामाचे कौतुक केले
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आर पी आयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील बहुतांशी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते
केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले......... शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना आहे त्यांनाच पक्षचिन्ह मिळेल
आम्ही आरपीआय साठी मंत्रिपद मागितले आहे काही महामंडळे तसेच उपाध्यक्षपदी देखील आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे
मुंबई महापालिका निवडणुकीत आरपीआय ची मते निर्णायक ठरणार आहेत त्याठिकाणी भाजप ने जर मनसेला जवळ केले तर मोठे नुकसान होईल कारण मनसे ला मुंबईतील यूपी बिहार साऊथ चे लोक मतदान करणार नाहीत अशी वस्तुस्थिती आहे आम्ही भाजप बरोबर मागील निवडणूक होतो यावेळी शिंदे गटाची ताकद आमच्या बरोबर आहे त्यामुळे मनसेची गरज मुंबई निवडणुकीत नाही त्यांना जवळ केल्यास या निवडणुकीत नुकसान होईल असे भाकीत केंद्रीय मंत्री आठवले यांनी व्यक्त केले
शरद पवार यांनी मध्यावती निवडणूक होतील असे भाकीत केले होते याबाबत बोलताना मंत्री आठवले म्हणाले... राज्यातील सरकार बदलले आहे त्यामुळे लोकांमध्ये उत्साह आहे शिंदे व फडणवीस हे दोन्ही नेते ऍक्टिव्ह आहेत ते राज्यभर फिरत आहेत लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत त्यामुळे राज्याला ते विकासाकडे नक्कीच घेऊन जातील पवारांनी केलेले भाकीत खोटे ठरेल आता बीजेपी चे सरकार अधिकाधिक बळकट होत चालले आहे मोदींना हरवणे कोण्या यड्या- गबाळ्याचे काम नाही असे सांगत मंत्री आठवले यांनी यावेळी बोलता बोलता नाव न घेता पवारांना टोलाही लगावला
No comments:
Post a Comment